Swabhimani Shetkari Sanghatana protest : ऐन दिवाळीत कृष्णा- वारणा काठावर ऊस आंदोलनाचा भडका | पुढारी

Swabhimani Shetkari Sanghatana protest : ऐन दिवाळीत कृष्णा- वारणा काठावर ऊस आंदोलनाचा भडका

इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा: गत हंगामातील उसाला प्रतिटन ४०० रुपये द्यावेत, या हंगामातील उसाला ३ हजार ५०० रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन आणखी तीव्र केले आहे. आज (दि.१०) वाळवा तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राजारामबापू, हुतात्मा कारखान्याकडे निघालेल्या बैलगाड्या, ट्रक्टर रोखून टायर्स फोडले. Swabhimani Shetkari Sanghatana protest

जोपर्यंत गतवर्षीच्या उसाला प्रतिटन ४०० रूपये देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ऐन दिवाळीत कृष्णा- वारणा काठावर आंदोलन पेटले आहे. आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बोरगाव, नवेखेड, जुनेखेड परिसरात राजारामबापू साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे बैलगाडी, ट्रॅक्टरचे टायर फोडले. Swabhimani Shetkari Sanghatana protest

राजारामबापू साखर कारखान्याच्या बावची, नागाव, पोखर्णी, ढवळी परिसरातील फडात जाऊन ऊसतोडी बंद पाडल्या. पडवळवाडी येथे हुतात्मा कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरच्या टायरी फोडल्या. आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात वाद झाला.

भागवत जाधव म्हणाले की, यंदा कमी पर्जन्यमान असल्याने साखर कारखाने ८० ते ८५ दिवस चालणार आहेत. त्यामुळे
शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नयेत.

यावेळी अॅड. एस.यू.संदे, जगन्नाथ भोसले, आप्पासाहेब पाटील, प्रकाश देसाई, धैर्यशील पाटील, प्रभाकर पाटील, पंडित सपकाळ, शहाजी पाटील, प्रताप पाटील, प्रदीप पाटील, काशिनाथ निंबाळकर, शामराव जाधव, सचिन यादव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button