‘आयुर्वेद ही आपली जीवनशैली, दीर्घायुष्‍यासाठी आयुर्वेद स्‍वीकारा’; नितीन गडकरींचे आवाहन

नितीन गडकरी
नितीन गडकरी
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्‍कृती असून त्‍याला जगात मान्‍यता म‍िळाली आहे. पंचकर्माला जगात मोठी मागणी आहे. आयुर्वेद केवळ चिक‍ित्‍सा पद्धती नसून आपली जीवनशैली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्‍थानच्‍या आयुर्वेदाच्‍या प्रचार व प्रसारासाठी सुरू असलेल्‍या विविध उपक्रमांचे गडकरी यांनी कौतुक केले.

आयुष मंत्रालय, भारत सरकारच्‍या अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली द्वारे संचालित क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान, नंदनवन, नागपूरच्‍या वतीने ८ व्‍या आयुर्वेद दिनाचे औचित्‍य साधून भव्‍य रॅलीचे आयोजन करण्‍यात आले. 'हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद' ही यावर्षीच्‍या आयुर्वेद दिनाची मध्‍यवर्ती संकल्‍पना होती. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण संस्था, क्रीडा चौक येथून द्रोणाचार्य पुरस्‍कार विजेते प्रशिक्षक विजय मुनिश्वर, आशियाई स्‍पर्धांमध्‍ये सुवर्णपदक पटकावणारी महाराष्‍ट्राची पहिली बॉक्‍सर अल्फिया पठाण, आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे सायकलपटू अमित समर्थ, ईश्वर देशमुख कॉलेजचे प्राचार्य एस. नायडू, राधाकृष्‍णन हॉस्पिटलचे अध्‍यक्ष डॉ. पोतदार यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करण्‍यात आला.

आयुर्वेदाच्‍या प्रचार व प्रसारासाठी काढण्‍यात आलेल्‍या रॅलीमध्‍ये आयुर्वेदाचा इत‍िहास उलगडणारे व आयुर्वेदाचा संदेश देणारे बैद्यनाथ, दत्‍ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, आयुर्वेद व्‍यासपीठ अशा विविध आयुर्वेद‍िक संस्‍थांचे चित्ररथ सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्‍या प्रत्‍येक सदस्‍य व संस्‍थांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्‍यात आले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news