नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणातील आरोपी रबू चाचाचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. 2 ऑगस्टपासून बेपत्ता सना खानच्या मृतदेहाचे गूढ अद्याप कायम आहे. सना खान यांचा धाकटा भाऊ मोहसीन खानच्या मते सापडलेला, कुजलेला मृतदेह सनाचा नाही. आरोपी अमित शाहूचे भाजपात लागेबांधे लक्षात घेता स्थानिक जबलपूर पोलिसही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तिच्या आईने यापूर्वीच केला आहे. अशावेळी भाजप पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी रब्बू चाचा उर्फ रविशंकर भगतराम यादव (५५) याचा जामीन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला.आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी मृतदेह सापडणे आवश्यक असल्याचे बोललं जातं आहे.