Coal scam case : विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोजकुमार जयस्वाल यांच्या शिक्षेला स्थगिती | पुढारी

Coal scam case : विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोजकुमार जयस्वाल यांच्या शिक्षेला स्थगिती

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कोळसा खाणवाटप घोटाळ्यात शिक्षा ठोठावण्यात आलेले राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि उद्योगपती मनोजकुमार जयस्वाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या शिक्षेला न्यायालयाने आज (दि.२७) स्थगिती दिली आहे. (Coal scam case)

छत्तीसगडमधील खाणवाटप प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ न्यायालयाने माजी खासदार विजय दर्डा आणि इतरांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी निकालाला आणि सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आव्हान दिले होते. या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ही शिक्षा स्थगित करावी, अशी विनंती करणारी याचिकाही त्यांनी सादर केली होती. (Coal scam case)

दिल्ली उच्च न्यायालयाने आज त्यांची ही याचिका मान्य करत त्यांच्या शिक्षेला सशर्त स्थगिती दिली. दरम्यान, न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास परवानगी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या घोटाळ्यात न्यायालयाने माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पूत्र देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जीचे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांच्यासह इतर आरोपींना दोषी ठरविले होते.

हेही वाचा 

Back to top button