Chandrasekhar Bawankule: पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

Chandrasekhar Bawankule: पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : चौकशीत पंकजा मुंडे ह्या योग्य उत्तर देतील, त्या आमच्या नेत्या आहेत, त्यांनी खूप काम केले आहे, भाजप त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा काढू नये की, त्या वेगळ्या निर्णय घेतील, त्यांच्या रक्तात भाजप आहे. बोलण्याचा विपर्यास करू नये, अडचणीच्या काळात काही नोटीस आली असेल मी त्यांच्याशी चर्चा करेल. काही खासदारांना डच्चू दिला जाणार या अफवा आहेत, अंतिम निर्णय, कोणाला तिकीट द्यायची हा अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी कमिटीचा असतो. जे घडलं नाही त्या बातम्या करू नयेत, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. (Chandrasekhar Bawankule)

मनोज जरांगे पाटील पुन्हा मराठा आरक्षण विषयी आक्रमक झाल्याकडे लक्ष वेधले असता, प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे यासाठी आंदोलन, मागण्या करणे हा समाजाचा अधिकार आहे. ओबीसीचे आरक्षण जाऊ नये, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी बसला आहे. कुणावरही सरकार अन्याय करणार नाही. (Chandrasekhar Bawankule)

अजित पवार लालबाग राजा दर्शन संदर्भात छेडले असता प्रत्येक पक्षातील लोकांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावेत, ही भावना असते. काँग्रेसमध्ये 15 मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसमध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक मुख्यमंत्री आहे, भावना आहे, यात गैर नाही. रोहित कंबोजच्या विधानाचाही विपर्यास करू नये, असे ते म्हणाले.

पटोले यांना भाजप समजलीच नाही, म्हणून भाजप सोडून ते काँग्रेसमध्ये गेले आहेत, व्यक्तीसाठी भाजप पक्ष काम करत नाही. अमृतकाळाचा भारत कसा असेल? यासाठी भाजप काम करत आहे, त्या संकल्पासाठी भाजप काम करत आहे, कधीच भाजपमध्ये स्फोट होऊ शकत नाही, पाय ओढण्याचे काम काँग्रेसमध्ये चालते. तिन्ही पक्षातील प्रमुख नेते आपला पक्ष मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. काँग्रेसच्या काळात आतंकवादी भारतात घुसत होते, कसाबसारख्या दहशतवादाची पेरणी काँग्रेसच्याच काळात झाली, पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याची ताकद भाजपने दाखविली आहे. या विषयावर नाना पटोले यांनी कुठली चौकात डिबेट करायला तयार आहेत, ते सांगावे, 65 वर्षात कसा आतंकवाद पसरवला? हे मी मांडतो, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले.

दरम्यान, नागपूर पूर परिस्थिती संदर्भात आज नुकसान जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. शेवटच्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळेपर्यंत मी लक्ष ठेवून आहे.

ओबीसी प्रश्नी बैठक 29 रोजी होत आहे. यात उपोषणकर्ते यांना बैठकीला बोलवले आहे, या बैठकीत मला बोलवले नाही यात काही नाही, मी सर्वपक्षीय बैठकीत होतो, ओबीसीचे आरक्षण कमी करायचे नाही, हा निर्णय सरकारने घेतला आहे, उपोषण सोडवण्यासाठी ती बैठक आहे, धनगर समाजाप्रमाणे ओबीसीचेही आंदोलन उपोषण संपेल, असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button