नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अमरावती पाठोपाठ नागपुरातही कोरोनाच्या जेएन-वन या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी (दि.२९) शहरात एका दिवशी कोरोना जेएन-वनच्या ११ रुग्णांची नोद झाली असून शहरात एकंदर २२ रुग्ण अँक्टिव्ह आहेत. यापैकी १८ रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर चार रुग्णांना मध्यम लक्षणांमुळे रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी एका दिवशी शहरात जेएन-वन या नवीन व्हेरिएंटचे ११ रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
नागपूर शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासन सज्ज झाले आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये सध्या ४६ केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाच्या जेएन-वन विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून अधिकाअधिक कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. कुणालाही सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास त्यांनी मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावरून नि:शुल्क चाचणी करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.
हेही वाचा :