

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कळमना ते राजनांदगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कामाला वेग आला असून, या मार्गावरील विविध रेल्वेस्थानके या रेल्वे मार्गाशी जोडण्यात येत आहेत. याच मालिकेत आता गंगाझरी रेल्वे स्थानकालाही जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील सर्व स्थानके तिसऱ्या मार्गाशी जोडल्यास प्रवासी वाहतुकीसह परिसरातील आर्थिक, सामाजिक विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर बातमी.