मिळालेल्या माहिती नुसार, नासिर उर्फ गब्बर मो. रमजान अन्सारी (वय 40 ) हा तरुण आज सायंकाळी फुटाना ओली चौकातील एका दुचाकीजवळ उभा राहून दुचाकीची छेड करत असताना तेथे उपस्थित नागरिकानी तो गाडी चोरी करीत असल्याचे समजून सदर तरुणास नागरिकांच्या जमावाने सामूहिक मारझोड केली. यानंतर त्याला जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. मात्र, काही वेळातच सदर तरुणाचा पोलीस स्टेशनमध्येच मृत्यू झाला.