नागपूर : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकी आज दुपारी 2 वाजेपर्यंत ६ जिल्ह्यांमध्ये सरासरी ६०.४८ टक्के मतदान झाले. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधकांच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
नागपूर (५२.७५ टक्के), वर्धा (६७.०६ टक्के), चंद्रपूर (६९.०६ टक्के), भंडारा (६३.५८ टक्के), गोंदिया (५७.१८ टक्के), आणि गडचिरोली जिल्हा ६९.६० (सकाळी ७ ते १वाजेपर्यंत) याप्रमाणे आहे. दरम्यान, नागपूर विभागीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज अजनी चौकातील माउंट कार्मेल गर्ल्स हायस्कूलला आणि खामला चौकातील जुपिटर उच्च प्राथमिक शाळा (ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ) या मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
हेही वाचलंत का ?