नागपूर : पक्षाचे चिन्ह असलेला स्कार्फ घातल्याने मविआ उमेदवार सुधाकर अडबालेंवर आक्षेप

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपुरातील मोहता विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर पक्षाचे चिन्ह असलेला स्कार्फ घालून प्रवेश केल्याबद्दल मविआचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. यावेळी नागो गाणार आणि सुधाकर अडबाले या दोघांनीही आपल्या विजयाचा दावा केला. ते माध्यमांशी बोलत होते. या दोघांच्या मतविभाजनात आपण यावेळी बाजी मारणार असल्याचा दावा राजेंद्र झाडे यांनी केला. २२ उमेदवार असले तरी या तीन प्रमुख उमेदवारात लढत आहे.
दुपारी १२ वाजेपर्यंत नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये सरासरी ३४.७० टक्के मतदान झाले. जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी अशी – नागपूर : (२९.८२ टक्के), वर्धा (३९.८० टक्के), चंद्रपूर (४२.१९ टक्के), भंडारा (३६.४८ टक्के), गोंदिया (३१.८७ टक्के) तर गडचिरोली (३५.६६).