CNG Price Hike : देशात सर्वात महाग सीएनजी नागपुरात; पुन्हा एकदा दरवाढ

CNG Price Hike : देशात सर्वात महाग सीएनजी नागपुरात; पुन्हा एकदा दरवाढ
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात सीएनजी चे दर प्रती किलो ६ रुपयांनी वाढले आहेत. जुने दर प्रति किलो ११० रुपये होते. तर नव्या दरात ६ रुपयांची वाढ झाली आहे. राज्यातच नव्हे तर देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात विकला जात आहे. राज्यातील सर्वात स्वस्त सीएनजी हे नाशिकमध्ये असून दर ६७.९० रुपये आहे. महाराष्ट्रात सीएनजी (CNG Price Hike) सरासरी ८२.६० रुपयांना विकला जात आहे.

(CNG Price Hike) इंधनदरातील वाढीमुळे नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा पर्याय वाहनधारकांसाठी होता. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र, सीएनजीच्या दरातही झपाट्याने होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर म्हणून सीएनजीकडे बघितले जाते. मात्र, नागपूर शहरात सीएनजीच्या दराचा भडका उडाला आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकला जात आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून, विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपुरात विकला जात आहे.

नागपूरमध्ये आजचा सीएनजीचा दर ११६ रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा १०६ रुपये ५ पैसे व डिझेलचे दर ९२ रुपये ६० पैसे आहे. देशातील सर्वात महागडा सीएनजी नागपूरमध्ये ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे. मुंबईत सीएनजी ८० रुपये दराने विकला जातो. सीएनजी वितरण कंपनी ग्राहकांना सरकारी सबसिडी न देता गॅस विकत असल्याचा आरोप ग्राहकांकडून हाेत आहे. त्यामुळे एवढ्या महाग दरात सीएनजी विकत घ्यावा लागत असल्याचा आरोपही ग्राहकांनी केला आहे.

CNG Price Hike : राज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर

नागपूर ११६ रुपये

पुणे- ८५ रुपये

पिंपरी चिंचवड- ८५ रुपये

मुंबई- ८० रुपये

नवी मुंबई- ८० रुपये

ठाणे- ८० रुपये

नाशिक – ६७.९० रुपये

धुळे- ६७.९० रुपये

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news