गोंदिया : पत्नीच्या अनैतिक संबंध संशयातून युवकाचा खून : आरोपीला जन्मठेप

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : 5 हजार रुपयाचा दंडही ठोठावला
Youth's murder on suspicion of wife's immoral relationship
पत्नीच्या अनैतिक संबंध संशयातून युवकाचा खूनFile Photo

गोंदिया : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन युवकाच्या घरात प्रवेश करून त्याचा खून करणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रूपये दंड, तर दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रल्हाद बिसराम कुंजाम (वय 45 वर्ष, रा. मगरडोह, ता. देवरी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पतीचे अनैतिक संबंध खपवून घ्यावे म्हणून विवाहितेचा छळ

देवरी तालुक्यातील मगरडोह येथे 1 ऑगस्ट 2021 रोजी सकाळच्या सुमारास हि घटना घडली. आरोपी प्रल्हाद याने पत्नी सोबत मृतक ललीत उदाराम उईके (वय 32, रा. मगरडोह, ता. देवरी) याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ललीत्या घरी गेला. तेथे त्याने 'तु माझे घरी कश्याला आला होता असे बोलूनʼ ललितला लाकडी ओंडक्याने त्याचे छातीवर मारून ठार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी फिर्यादी देवचंद लालाजी उईके (वय 51 वर्ष, रा. मगरडोह) यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तपास अधिकरी सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल तवाडे, व दुय्यम तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शरद पाटील यांनी या गुन्ह्याचा उत्कृष्ठ तपास करून आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुरावे, परिस्थिती जन्य पुरावे गोळा केले. तर सबळ साक्ष पुराव्यांच्या आधारावर आरोपी विरूध्द दोष निष्पन्न होत असल्याने तपासाअंती जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोप पत्र न्यायाकरीता सादर करण्यात आले. त्याच्यावर खटला चालविण्यात आला. दरम्यान, सरकार पक्षातर्फे सरकारी वकील कैलास खंडेलवार यांनी भक्कम युक्तिवाद केले. या अनुषंगाने न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत युक्तीवादानंतर सबळ साक्ष पुरावे, परिस्थितीजण्य पुराव्यावरून आरोपी विरूध्द दोषसिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया न्यायाधीश खोसे यांनी सदर खून प्रकरणाचा निकाल दिला. आरोपी प्रल्हाद कुंजाम यास जन्मठेपेची आणि 5 हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या केसमध्ये महिला पोलीस हवालदार रिम्पी हुकरे , पोलीस स्टेशन चिचगड यांनी काम पाहिले.

Youth's murder on suspicion of wife's immoral relationship
यवतमाळ हादरले : अनैतिक संबंध, पूर्ववैमनस्यातून दोन तरूणांचा खून

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news