गोंदिया : नाल्यामध्ये बुडून दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू

गोंदियामधील हिरडामाली पोंगेझरा येथील घटना
Two little siblings died after drowning in the drain
नाल्यामध्ये बुडून दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यूPudhari News Network
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली पोंगेझरा येथे घराशेजारील वाहणाऱ्या नाल्यामध्ये पडून शुक्रवारी (दि.6) मृत्यू झाला. मृत दोन भांवडे नाल्यावर असणाऱ्या पुलावर खेळत होती. खेळता खेळता पाय घसरुन ती नाल्यामध्ये पडली. यानंतर त्यांच्या नाल्यामध्ये पडून मृत्यू झाला. रुद्र सुजित दुबे (वय.३) आणि शिवम सुजित दुबे (वय.२) अशी दोन्ही मृत भावंडांची नावे आहेत.

Two little siblings died after drowning in the drain
Nashik | रापलीत पाच वर्षीय बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू

हिरडामाली येथे पोंगेझरा देवस्थान असून या देवस्थानात सुजित दुबे हे पुजारी आहेत. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासह देवस्थान परिसरातच वास्तव्यास आहेत. त्यांच्या राहत्या घराशेजारून एक नाला वाहत असून नाल्यावरील पूलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहत असते. दरम्यान, शुक्रवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास रुद्र आणि शिवम हे दोघेही खेळता खेळता या पुलावर पोहोचले. तेव्हा पायघसरुन नाल्यामध्ये वाहत गेले. याची माहिती कोणालाही लागली नाही. रात्रीच्या सुमारास त्याचां शोध घेतल्यानंतर त्यांचा कोठेही पत्ता लागला नाही. यानंतर पुजारी सुजित दुबे यांनी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे गाठून दोघेही मुले हरविल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी हरवल्याची नोंद करून दोन्ही भावडांचा शोध घेतला मात्र, ते कुठेही मिळून आले नाही. तेव्हा आज, शनिवारी पुन्हा शोधकार्य करण्यात आले. शेवटी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घराशेजारील नाल्यातच तरंगताना आढळून आले. घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news