Nashik | रापलीत पाच वर्षीय बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू

पोलिसांकडून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
chandwad
कृष्णा ज्ञानेश्वर बिडगरpudhari news network
Published on
Updated on

चांदवड : तालुक्यातील रापली गावातील बिडगर वस्तीवरून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला आहे. (Krishna's body was found in a well near the house)

पोलिसांनी दिलेली माहिती व ज्ञानेश्वर सुभाष बिडगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते कुटुंबीयांसमवेत बिडगर वस्ती येथे वास्तव्यास आहे. रविवार (दि.१) ज्ञानेश्वर बिडगर हे कामानिमित्त मनमाडला तर पत्नी कामाला गेली होती. घरी मुलगा कृष्णा (५) व आजोबा सुभाष बिडगर हे दोघेच होते. मनमाड येथील काम आटोपल्यावर ज्ञानेश्वर बिडगर हे घरी आले, पण कृष्णा कुठे दिसला नाही. त्यामुळे त्यांनी कृष्णाचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला होता. मात्र, सोमवारी (दि. २) सायंकाळी कृष्णाचा मृतदेह घराजवळील विहिरीतच आढळून आला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news