गोमांस बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; ४० किलो गोमांस जप्त

केशोरी पोलिसांची कारवाई
Gondiya NEws
गोमांस बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; ४० किलो गोमांस जप्तPudhari Photo
Published on
Updated on

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तुकूमनारायण येथे शुक्रवारी (दि.17) केशोरी पोलिसांनी कारवाई करीत ४० किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र राऊत, आत्माराम चवरे व सतीश वासनिक अशी संशयितांची नावे आहेत.

Gondiya NEws
Raigad Crime | गोमांस तस्करी करणारा टेम्पो पकडला, कर्जत पोलिसांची कारवाई

केशोरी पोलिसांना तुकूमनारायण परिसरात काही इसम गोमांस बाळगून असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जितेंद्र राऊत याच्या घरी छापामार कारवाई केली. यावेळी आरोपी जितेंद्रच्या घरी ४० किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी सदर गोमांस जप्त करून आरोपीची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात आणखी दोघे आरोपी असल्याचे पुढे आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र राऊत यांच्यासह आत्माराम चवरे व सतीश वासनिक याच्यावर दोघांवरही विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हर्षल भोळे, पोलिस हवालदार होळी, राऊत, निकोडे, महिला पोलीस नायक सुखदेवे, पोलीस शिपाई युवकांत भेंडारकर, नितिन डुंबरे,वाहन चालक अन्वर, पुस्तोडे यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश आंधे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news