Raigad Crime | गोमांस तस्करी करणारा टेम्पो पकडला, कर्जत पोलिसांची कारवाई

कर्जत-चारफाटा येथे दोघे पोलिसांच्या ताब्यात
Raigad Crime
गोमांस तस्करी करणारा टेम्पो पकडलाPudhari Photo
Published on
Updated on

नेरळ : कर्जत तालुक्यात गोमांस तस्करी व गो हत्याची प्रकरणे उघड झाली असुन, त्या विरोधात कर्जत व नेरळ पोलिसांकडून अनेकवेळा कारवाई झाल्याचे वास्तव व नुकतीच उमरोली येथे गोमांस घेऊन जाणारा कारचा पाठलाग करीत एकाला अटक केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवार कर्जत-चारफाटा येथे गोमांसानी भरलेला टेम्पो हा गोरक्षक व नागरिकांच्या सतर्कतेमुळे कर्जत पोलिसांनी पकडला आहे. यावेळी दोघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-चारफाटा येथे 1 ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलच्या बाजूला पिकअपला टोइंग केलेला टेम्पो उभा होता. यावेळी येथून जाणार्‍या काही नागरिकांना या वाहनाबद्दल संशय वाटला असता त्यांनी वाहनासोबत असणार्‍या व्यक्तीची चौकशी करण्यास सुरुवात केली, मात्र ते उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले. यावेळी तेथे असणारे बल्लाळ कडू यांनी टेम्पोत काय आहे हे बघितले असता त्यांना टेम्पोत शेकडो किलो कत्तल केलेले गो मांस आढळून आले. यानंतर कडू यांनी त्यातील एकाला पकडून ठेवले. मात्र बाकीचे त्याचे साथीदार तिथून पसार झाले.

सदर घटनेची खबर ही कर्जत पोलीस ठाण्यात मिळताच घटनास्थळी धाव घेत गोमांसाने भरलेला टेम्पो व टोइंग केलेला टेम्पो ताब्यात घेत, नागरिकांनी पकडलेल्या गोमांस तस्करी करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर कर्जत पोलिसांनी सदर गोमांस हे एका निर्जनस्थळी जमिनीमध्ये पुरून सदर गोमांसाची विल्हेवाट लावली आहे. या संदर्भात ताब्यात घेणार्‍या दोघांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर कारवाईत तीन लाख रूपये किंमतीचा एमएच 47 एएस 3164 पांढर्‍या रंगाचा पिकअप टेम्पो, पाच लाख रुपये किंमतीचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला.

1600 किलो गोमांस जप्त

यामध्ये अंदाजे 1500 ते 1600 किलो वजनाचे तीन लाख रुपये किंमतीचे गोवंशीय जनावरांचे गोमांस असे एकूण अकरा लाखाचा मुद्देमाल कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतला असुन, ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एकाचे नाव मोहम्मद हुसेन अब्दुल मोहित सिद्धिकी वय वर्ष 34, रा. खिंडीपाडा, दुर्गा रोड, भांडूप पश्चिम मुंबई, तर दुसरा नवाज अब्दुल बशीर सय्यद वय वर्ष 39, रा. म्हाडा कॉलीनी, 2 नंबर बिल्डींग, दुसरा मंजला, जुहू गल्ली, अंधेरी मुंबई येथील असुन, पुढील तपास हा उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे व पोलीस निरिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी शिंदे हे तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news