गोंदिया : मालकाने ड्रायव्हरची हत्या करुन मृतदेह पुरला खड्डयात

गोंदिया पोलिसांचा सिनेस्टाईल तपास; ४ दिवसानंतर गुन्हा उघडकीस
The owner killed the driver and buried the body in a pit
मालकाने ड्रायव्हरची हत्या करुन मृतदेह पुरला खड्डयात File Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : उधार नेलेले ८० हजार रुपये परत करत नाही व कामावरही येत नाही, म्हणून मालकानेच पत्नी, मुलगा आणि अन्य साथीदारांच्या मदतीने आपल्या वाहनचालकाचा खून करून त्याचा मृतदेह शहरातील गौतमनगर स्मशानभूमीला लागून असलेल्या झुडपी जंगलात पुरला. २९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा गोंदिया शहर पोलिसांनी कोणतेही पुरावे नसताना सिनेस्टाईल तपास करून ४ दिवसानंतर अर्थात २ ऑक्टोबरला उलगडा केला. शांतनू अरविंद पशिने (वय ३६, रा. मोहगाव, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.

The owner killed the driver and buried the body in a pit
Crime News | कांदा व्यापारी नाथा ढाकणे यांची हत्या की आत्महत्या?

मागील काही दिवसांमध्ये ६ ते ७ जणांनी एका युवकाचा खून करून मृतदेह जंगलात पुरला आहे, अशी चर्चा सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या एका खबऱ्याने ऐकताच त्याने ही माहिती गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम थेर यांच्यामार्फत ठाणेदार किशोर पर्वते यांना दिली. यावर ठाणेदार पर्वते यांनी पोलिस ताफ्यासह गुप्तरित्या पूर्ण परिसर पिंजून काढला. तथापि, २ ऑक्टोबर रोजी ठाणेदार पर्वते यांनी सहकारी पोलिसांसह मध्यरात्री गौतमनगर येथील स्मशानभूमीलगतचा झुडपी जंगल पिंजून काढला. या ठिकाणी एक मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर सदर मृतदेह खड्ड्याबाहेर काढला. मृताचा फोटो परीसरातील लोकांना दाखविला असता त्यातील काही जणांनी सदर मृतदेह शांतनू पशिने याचा असल्याचे आणि तो विक्रम बैस (रा. गौतमनगर) याच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून असल्याचे ओळखले. यावरून पोलिसांनी विक्रम बैस याच्याबाबत चौकशी केली असता तो आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार असल्याचे आढळून आले. तसेच विक्रम बैससोबत राहणारे अन्य तीन ते चारजणसुद्धा फरार असल्याचे चौकशीत दिसून आले. या प्रकरणी ठाणेदार किशोर पर्वते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम करीत आहेत.

असा आहे घटनाक्रम...

शांतनू पशिने हा विक्रम बैस याच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. त्याने विक्रम बैसकडून ८० हजार रुपये उधारी घेतले होते. कामावरसुद्धा येत नव्हता. त्यामुळे विक्रम बैस याने पत्नी, मुलगा व त्याच्या साथीदारांच्या मदतीने शांतनूला गौतमनगर स्मशानभूमीस्थित झुडपी जंगल परिसरात नेऊन लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली व जीवे ठार मारले. इतकेच नव्हे, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झुडपी जंगलात पाच फुट खोल खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरला.

The owner killed the driver and buried the body in a pit
ठाणे : कल्याण-मलंगगड रोडवर रक्तरंजित थरार, मध्यरात्री तरुणाची हत्या

हे आहेत संशयित आरोपी...

गोंदिया शहर पोलिसांनी खासगी टिव्ही चॅनलवरील क्राईम पेट्रोल मालिके प्रमाणे या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला असून विक्रम उर्फ विक्की पवन सिंग बैस (वय ३६), किरण विक्रम बैस (वय ३२), चित्ता विक्रम बैस (वय १९, सर्व रा. गौतमनगर, गोंदिया) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. तर, अन्य ३ ते ४ आरोपींचाही यात समावेश आहे. हे सर्व आरोपी फरार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news