Gondia News | गोंदिया जिल्ह्यात 'गजराज रिटर्नʼ; हालचालीवर वनविभागाची नजर

शेतात आढळल्या हत्तीच्या पाऊलखुणा
Elephant at Gothangaon
नवेगावबांध व गोठणगाव वनपरिक्षेत्रातील जंगलात हत्तीने ठिय्या मांडला आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील जंगलात धुडगूस घालणाऱ्या रानटी हत्तींचे पुन्हा जिल्ह्यात आगमन झाले आहे. चार दिवसांपासून एका हत्तीने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध व गोठणगाव वनपरिक्षेत्रातील जंगलात आपला ठिय्या मांडला आहे. आज (दि.३०) सकाळी गोठणगाव परिसरातच या हत्तीचे लोकेशन दिसून आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत या हत्तीकडून मोठे नुकसान करण्यात आले नसले तरी सोमवारी (दि. २९) सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील खाकरी ते चिचोलीदरम्यान शेती परिसरातून धानाच्या पर्ह्यांना चिरडत गेल्याच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. (Gondia News)

Elephant at Gothangaon
राष्ट्रवादीला धक्का! गोदिंयाच्या नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

हत्तींकडून धान पिकाची नासधूस

२०२२ च्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात रानटी हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात जंगल वाटेतून प्रवेश करून खरीप हंगामातील धान पिकाची नासधूस केली होती. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी धानाची कापणी व मळणी करून धानाची पोती शेतात ठेवली असता या हत्तींनी धानाच्या पोत्यांची नासाडी केली होती. तब्बल दीड ते दोन महिने या हत्तीच्या कळपाने जिल्ह्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील जांभडी, गांधारी, नांगलडोह, इटियाडोहसह चिचगड वन परिक्षेत्रातील घोगरा, चिलमटोला, नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील कवठा, कान्होली व जब्बारखेडा परिसरात धुमाकूळ घातला होता. (Gondia News)

Elephant at Gothangaon
गोंदिया : ट्रॅक्टर चालकाची हुशारी अंगलट; पुरात ट्रॅक्टर वाहून गेला

पश्चिम बंगाल येथून पथकाला पाचारण

दिवसभर जंगल परिसरात राहिल्यानंतर हत्ती रात्रीच्या सुमारास शेतशिवारात येऊन धान पिकाची नासाडी करायचे. तर नागरी वस्त्यांकडेही या हत्तींनी लक्ष्य केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यावेळी वन विभागाचीही चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले होते. यावेळी हत्तींवर नियंत्रण मिळविण्यासाठी पश्चिम बंगाल येथून एका पथकाला पाचारणही करण्यात आले होते. त्यात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पुन्हा हे हत्ती गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलमार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले होते. (Gondia News)

Elephant at Gothangaon
गोंदिया : खाणीत पोहायला गेलेल्या १० वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

हत्तीच्या आगमनाने शेतकर्‍यांमध्ये धडकी

२७ एप्रिल २०२३ मध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कारूझरी येथील रब्बीच्या उभ्या पिकातून मार्ग काढत नवेगावबांध उद्यान परिसरात हत्तींनी धुडगूस घातला होता. तर राष्ट्रीय उद्यानातही तोडफोड करत गडचिरोली जिल्ह्याकडे निघून गेले होते. मात्र, आता पुन्हा या हत्तींच्या कळपातील एका नर हत्तीने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जंगलात एन्ट्री केली असून मागील तीन ते चार दिवसांपासून नवेगावबांध ते गोठणगाव वनपरिक्षेत्रात हत्तीच्या पाऊल खुणा दिसून येत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांसह शेतकर्‍यांमध्ये आता धडकी भरली आहे.

Elephant at Gothangaon
गोंदिया जिल्ह्यातील 25 ठिकाणी अतिवृष्टी

असे आहे लोकेशन...

मागील चार दिवसांपासून नवेगावबांध परिसरात वास्तव्यात असलेला हत्ती २७ जुलै रोजी दिवसभर कवठा परिसरात होता. मात्र, रविवारी गोठणगाव वनपरिक्षेत्रात असल्याची माहिती गोठणगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी दिली होती. त्यातच काल, सायंकाळच्या सुमारास खोकरी ते चिचोली दरम्यान हत्तीच्या पाऊल खुणा एका शेतात दिसून आल्या. तर आजही गोठणगाव परिसरातच त्याचे लोकेशन दिसून येत आहे.

Elephant at Gothangaon
गोंदिया : रेल्वेच्या धडकेत दोन अस्वल ठार

शेतकर्‍यांमध्ये दहशत

वन्यजीव विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्या एकच हत्ती असल्याचे कळते. हत्ती आल्याची वार्ता मिळताच शेतकरी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मुसळधार पाऊस व पुरामुळे तालुक्यात व परिसरात धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना आता थोडेफार उरलेले पीकही हत्ती नष्ट तर करणार ? अशी भीती परिसरातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Elephant at Gothangaon
गोंदिया : महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला पाच वर्षाचा कारावास
प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक व फिरते गस्तीपथक हत्तीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. गावातील लोकांना सतर्क राहावे तसेच शेतात जातांना गटागटांमध्ये सावधरित्या जावे, कोणत्याही हरकती करू नये, हत्तीच्या जवळ जाऊ नये, हत्ती बिथरतील असे कुठलेही कृत्य करू नये, आदी सुचना देण्यात येत आहेत. सध्या हत्ती जुनेवाणी, राजोली मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अगोदर एक हत्ती पुढे येऊन पाहणी करून जातो व नंतर कळप घेऊन परत येतो. असे हत्तींचे वर्तन असते. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेऊन सावध रहावे.
- पवन जेफ, उप संचालक, नवेगाव-नागझिरा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news