गोंदिया : ट्रॅक्टर चालकाची हुशारी अंगलट; पुरात ट्रॅक्टर वाहून गेला

बाघनदीच्या शिलापूर-पुराडा पुलावरील घटना
The tractor was swept away in the river flood
नदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेला.
Published on
Updated on

गोंदिया : नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून पूल ओलांडत असलेला ट्रॅक्टरसह चालक वाहून गेला असून देवरी तालुक्यातील शिलापूर- पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुलावर सोमवार (दि.२२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा मारोती वलथरे (३०) रा पद्मपुर असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक सुखरूप बचावला. मात्र, ट्रॅक्टर चालकाची हुशारी अंगलट येऊन नदीच्या प्रवाहात ट्रॅक्टर वाहून गेल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

The tractor was swept away in the river flood
Kolhapur | पंचगंगा नदी पुन्हा इशारा पातळीच्या दिशेने

पावसाचे सुरूवातीचे नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून नद्या दुथळी भरून वाहत आहेत. दरम्यान, शिरपूरच्या मनोहर सागर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले आहे. त्यामुळे बाघनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन नदीला पूर आला आहे.

अशातच, चालक कृष्णा हा शेतीच्या कामासाठी रोजंदारीच्या महिलांना सोडायला गेले होता. दरम्यान, परतीच्या प्रवासात पुलावरुन पुराचे पाणी जात असतानाही चालकाने अति आत्मविश्वासाने पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याचा अतिआत्मविश्वास नडला व पुराच्या पाण्याच्या वेगात ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन वाहून गेला. दरम्यान, चालक कृष्णाला पोहता येत असल्याने तो सुखरूप बाहेर निघाला. परंतू ट्रॅक्टर वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

The tractor was swept away in the river flood
पंचगंगा नदी पुन्हा घामटा फोडणार? २०१९ ची पातळी गाठण्यास फक्त…..

पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष

घटनास्थळी अनेक वर्षापासून पुलाची मागणी केली जात असून लोकप्रतिनिधी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news