सोन्या - चांदीचे दागिने चोरणारा आंतरराज्यीय चोरटा जेरबंद

Gondia News | १.५९ लाख रुपयांचा मुद्येमाल हस्तगत
Gondia police arrest jewelry thief
सोने चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली. Pudhari Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गणेशनगर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून ५६ हजार ७०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरलेल्या दागिन्यांसह चोरीच्या कामात वापरलेली दुचाकी व इतर साहित्य असा १. ५९ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरातील गणेशनगर परिसरातील फिर्यादी आकाश कैलाशचंद्र अग्रवाल (वय ४८ रा. गणेशनगर, गोंदिया) यांच्या आकाश ज्वेलर्स येथे गेल्या आठवड्यात २९ सप्टेंबररोजी दुपारी ३.३० वाजता ते रात्री ८ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व नगदी असा एकूण ५६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनीय सुत्राच्या आधारे शोध घेऊन आरोपी लोकेश कपील श्रीवास (वय ३३ रा. कैलाश नगर, क वर्धा, जि. कबीरधाम (छत्तीसगड) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले.

दरम्यान, त्यास ३० सप्टेंबररोजी अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने व नगदी तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, इलेक्ट्रीक कटर (ड्रील मशीन), स्क्रू डायवर, एक बॅग असा १ लाख ५९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल गुन्ह्यात हस्तगत करून जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दीपक रहांगडाले करीत आहेत.

विविध राज्यातील पोलीस ठाण्यात ८ ते ९ गुन्ह्यांची नोंद

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक गुन्हा केल्याची कबुली दिली असतानाच त्याच्या विरोधात विविध राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सोने-चांदी चोरीचे ८ ते ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याबाबत गोंदिया शहर पोलीस अधीकचा तपास करीत आहेत.

Gondia police arrest jewelry thief
गोंदिया : मालकाने ड्रायव्हरची हत्या करुन मृतदेह पुरला खड्डयात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news