गोंदिया: पिंडकेपार येथे मधमाशांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील ६ जण जखमी

मधमाशी पोळे
मधमाशी पोळे
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा :  देवरी तालुक्यातील पिंडकेपार / गो. येथील तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर मधमाशांनी हल्ला करून जखमी केले. ही घटना आज (दि. ३) घडली. अकील नागदेवे (वय ५०), अनुसया नागदेवे ( वय ४५), नेहा नागदेवे (वय २३), नंदिनी नागदेवे (वय २०), दामिनी नागदेवे (वय १८), रविता नगदेवे (वय २६ ) अशी सर्व जखमींची नावे आहेत.
सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्याचा हंगाम जोमात सुरू आहे.  पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग रात्रदिवस जीवाची पर्वा न करता जंगल शिवारामध्ये जात असतात. यातच नागदेवे कुटुंबीय, पिंडकेपार गाव क्षेत्रातील खोळाया तलाव परिसर जंगलात तेंदूपान संकलन करण्यासाठी गेले होते.
दरम्यान, तेंदूपान संकलनाची लगबग सुरू असतानाच अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब जखमी झाले. त्यांना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news