गोंदिया : विहिरीत पडून अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

अर्जुनी-मोरगाव येथील घटना
Gondia well accident
विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
Published on
Updated on

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव शहरातील प्रभाग क्र. ५ येथील अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) दुपारी २.३० च्या सुमारास घडली. रेयांस संदिप शहारे (अर्जुनी मोरगाव) असे या चिमुकल्याचे नाव आहे.

Gondia well accident
सावधान! जगासमोर आता सुपरबग्जचे संकट; २५ वर्षांत होतील ४ कोटी मृत्यू

रेयांस हा घरासमोर खेळत असताना अचानक आईची व घरच्या मंडळींची नजर चुकवून अंगणातील विहीरीकडे गेला. यावेळी खेळताना त्याचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यु झाला. रेयांस दिसत नाही म्हणून घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण रेयांस कुठेच सापडला नाही. प्रभागातील काही लोकांनी विहीरीत डोकावून पाहिले असता तो नजरेश पडला. त्याला बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रेयांसचे वडील संदिप शहारे हे मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून रेयांस हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्देवी घटनेमुळे अर्जुनी मोरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gondia well accident
बीड : लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला भरधाव कारने उडवल्याने जागीच मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news