बीड : लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला भरधाव कारने उडवल्याने जागीच मृत्यू

चिकलठाणा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद; पुढील तपास सुरू
Road Accident In beed
मृत सचिन पानखेडेPudhari Photo
Published on
Updated on

धोंडराई, पुढारी वृत्त : लघुशंकेसाठी थांबलेल्या एका तरुणाला उतरतं असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या क्रमांक (एमएच -२० जीसी - ५५०९) या वाहनाने कारमधील लघुशंकेसाठी जात असलेल्या एका तरुणाला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१६) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सचिन भागतराव पानखडे (वय-३२, रा. राजपिंपरी, ता. गेवराई, जि. बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

Road Accident In beed
ठाणे : डेंग्यूच्या आजाराने तरुणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पानखडे हे आजारी असल्याने त्यांना सोमवारी (दि.16) छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी त्यांचे वडील व नातेवाईक हे घेऊन जात होते. यावेळी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने झालेल्या बीड बायपास उड्डाण पुलाजवळ छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबले होते. सचिन पानखडे हे गाडीतून खाली उतरून जातं असताना पाठीमागून आलेल्या भरधाव हायवाने सचिन यांना जोरदार धडक देत जवळपास शंभर फुटांपर्यंत फरफट नेल्यानंतर, तसेच वाहनाचे चाक सचिन यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात होताच हायवा चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला होता. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चिकलठाणा पोलिस करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news