Gondiya Ganja Smuggling
गांजा तस्कराला अटक करुन जप्त करण्यात आलेला मुद्देमालPudhari Photo

गोंदिया जिल्ह्यात गांजा तस्कर सक्रीय!

५ किलो गांजासह आणखी एका तस्कराला अटक स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
Published on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील देवरी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नाकाबंदी करून दोन गांजा तस्करांना १२० किलो गांजासह ताब्यात घेतले होते. या प्रकारे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने आणखी एका गांजा तस्कराला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार (दि. ७) रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी तस्कराकडून ५ किलो गांजा व दुचाकी असा २.९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन दिवसात तीन गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यात गांजा तस्कर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

Gondiya Ganja Smuggling
गोंदिया : नागपूरकडे नेत असलेला १२० किलो गांजा जप्त; दोन तस्कर ताब्यात 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दित अवैध धंदे, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना रात्री अंदाजे १.३० वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील दासगाव ते माकडी जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती मोपेड दुचाकीने संशयास्पद स्थितीत दिसून आला. यावेळी त्यास थांबवून त्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान त्याने आपले नाव घनश्याम टोलीराम तुरकर (वय ५७ रा. तेढवा ता. जि. गोंदिया) असे सांगीतले. तर त्याच्या ताब्यातील वाहनावरील प्लास्टिक बोरीबाबत चौकशी केली असता त्याने उडवा उडविचे उत्तरे दिली.

Gondiya Ganja Smuggling
शेतात लावण केलेला ३५ किलो गांजा पोलिसांकडून जप्त; दोघांना अटक

यावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसानी सदर आरोपीला ताब्यात घेत बोरीची पाहणी केली. ज्यामध्ये लास्टिक बोरीत प्लास्टिक वेस्टन असलेले गांजाचे ५ किलो वजनाचे ५ पॉकिट दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी त्याचेकडील ५ किलो गांजा, एक ज्यूपिटर दुचाकी, मोबाईल व ईतर साहित्य असा एकूण २ लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरूध्द रावणवाडी पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायदा कलम ८ (क), २०, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला जप्त मुद्देमालासह रावणवाडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news