गोंदिया : नागपूरकडे नेत असलेला १२० किलो गांजा जप्त; दोन तस्कर ताब्यात 

देवरी पोलिसांची सिमा शुल्क तपासणी नाक्यावर कारवाई 
Gondia Crime News
गांजा जप्तfile photo
Published on
Updated on

गोंदिया : रायपूरकडून नागपूरकडे गांजाची अवैध वाहतूक करणार्‍या २ गांजा तस्करांना देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवार ( दि.५) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर येथील सिमा शुल्क तपासणी नाक्यावर करण्यात आली. यावेळी पोलिसांनी वाहन व १२० किलो गांजासह मुद्देमाल जप्त केला आहे. 

रायपूरकडून देवरी मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनामधून गांजा तस्करी होत असल्याची माहिती देवरी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांकडून शनिवारी शिरपुर/ बांध येथील सिमा शुल्क तपासणी नाक्यावर नाकाबंदी कारवाई करण्यात आली. दरम्यान, रात्री ८.३० वाजताच्या सुमारास रायपूरकडून नागपूरकडे जात असलेला चारचाकी वाहन क्रमांक आर जे ०८ टीए १८३६ च्या चालकाने नाकेबंदीदरम्यान आपले वाहन वेगात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शिताफीने वाहनाला थांबवून पाहणी केली असता डिक्कीतून प्रत्येकी ५ किलो प्रमाणे २४ पॅकेट असा १२० किलो ओला गांजा आढळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी दोन तस्करांना ताब्यात घेत दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यावेळी गांजा, कार व मोबाइल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व पोलीस पथकाने केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news