गोंदिया : चुरडीफाटा येथील अपघातात एक महिला जागीच ठार

ट्रकने मागून दिलेल्या दुचाकीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
A woman died on the spot after being hit by a bike from behind by a truck
ट्रकच्या धडकेत महिला दुचाकी चालक ठारPudhari File Photo

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : चुरडी फाटा येथील वीज प्रकल्पातून एक ट्रक राख वाहून घेवून जात होता. या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात घडल्याची घटना गुरुवारी (दि.27) समोर आली आहे. या अपघातात दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीचालक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रमिला प्रमोद थुलकर (वय.45, रा. ठाणेगाव ता. तिरोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

तिरोडा जवळील गुमाधावडा येथील एमआयडीसी परिसरातून अदानी वीज प्रकल्पातून राख घेऊन जाणारा ट्रक क्रमांक (एमएच 35 एजे 3609) ठाणेगाववरून तिरोडाकडे जाणार्‍या दुचाकी क्रमांक (एमएच 49 एएम 1956) ला जोरदार धडक दिली, या धडकेत दुचाकीस्वार प्रमिला थुलकर यांच्या जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालक जखमी झाला आहे. या घटनेची पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्यात आली आहे.

A woman died on the spot after being hit by a bike from behind by a truck
हिंगोली : पिकअप पलटी होऊन अपघात; दोघे ठार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news