गडचिरोली : गोवंशाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
Gadchiroli News
अटक करण्यात आलेले आरोपी आणि पोलिस अधिकारीPudhari Photo
Published on
Updated on

गायी आणि बैलांना पिकअप वाहनांमध्ये निदर्यपणे कोंबून कत्तलीसाठी त्यांची वाहतूक करीत असताना धानोरा पोलिसांनी गोडलवाही फाट्याजवळून तीन जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गोवंश आणि वाहनांसह ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रतीक बांबोळे (रा.उसेगाव ता.सावली) भुवन सोनुले(रा.सावली) गोलू फाले (रा.पारडी ता.सावली) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

Gadchiroli News
गोवंश हत्येविरोधात रत्नागिरीत एल्गार

सोमवार (दि.26) सकाळी गोडलवाही येथून गडचिरोलीच्या दिशेने दोन पिकअप वाहनांमध्ये गायी आणि बैलांना कोंबून कत्तलीसाठी त्यांची वाहतूकीची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. यानंतर धानोरा पोलिसांनी गोडलवाही फाट्याजवळ पाळत ठेवली. यावेळी समोरुन येणाऱ्या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यात ६ बैल आणि ८ गायी आढळून आल्या. पोलिसांनी १ लाख १५ हजार रुपये किमतीचे गोवंश आणि ८ लाख रुपये किमतीची दोन पिकअप वाहने ताब्यात घेतली.

Gadchiroli News
Raigad News : राजेवाडी येथे गोवंश हत्या, महाडमध्ये तणावपूर्ण शांतता!

यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोराचे पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे, उपनिरीक्षक चैत्राली भिसे, सुमित चेवले, सहायक फौजदार टेंभुर्णे, हवालदार गावडे, रवींद्र मडावी, बोरकुटे, मानकर, चंद्रशेखर मैंद, शशिकांत मडावी यांनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news