Raigad News : राजेवाडी येथे गोवंश हत्या, महाडमध्ये तणावपूर्ण शांतता!

Cow slaughter
Cow slaughter

महाड वृत्तसेवा, : महाड तालुक्यातील राजेवाडी येथे गायींची कत्तल करण्यात आली. याची माहिती गोरक्षकांना मिळाली. माहिती मिळताच गो रक्षकांनी तिथे धाव घेतली. गो हत्या करू नका, असे सांगत असताना गो रक्षक यांना गावातील इतर नागरिकांना बोलवून घेरण्यात आले. त्यानंतर गो रक्षक यांना सोडविण्यासाठी गेलेल्या पत्रकारासह एक पोलीस कर्मचारी आणि काही नागरिकांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी (दि.30) रात्रीच्या सुमारास घडली.

घटनेबाबत गुरुवारी सकाळी गो रक्षक आणि समस्त गोमाता प्रेमी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कत्तल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलीस प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार, असे सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेत बाधा येणार नाही, असे सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस विभागीय अधिकारी शंकर काळे यांनी केले असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे स्पष्ट केले. महाड शहरात तसेच राजेवाडी परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तालुक्यातील राजेवाडी गावात बुधवारी रात्रीच्या सुमारास 3 मुक्या जनावरांची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती महाड पोलादपूर मधील गो रक्षक यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. या प्रकारची गंभीर नोंद घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, रायगडचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने महाडला भेट देण्यासाठी येणार असल्याचे डीवायएसपी शंकर काळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

नागरिकांनी शहरात होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता मिळणाऱ्या बातम्या संदर्भात पोलीस प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत डीवायएसपी काळे यांनी जनतेला केले आहे. तालुक्यात सद्यस्थितीमध्ये संपूर्ण शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news