Gadchiroli Earthquake : सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले धक्के

धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले
Earthquake
Earthquake
Published on
Updated on

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आज पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी ३.६ तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून, त्याचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यातील अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Earthquake
Himalayas Earthquakes: हिमालय सतत का थरथरतोय...? गेल्या महिन्याभरात तब्बल १३० भूकंपाचे झटके

दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलेले नाही. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली जात असून, संभाव्य नुकसानीबाबत पाहणी करण्यात येत आहे. नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये, शांतता राखावी आणि आवश्यक ती दक्षता बाळगावी. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

यापूर्वीही झाला होता भूकंप

सिरोंचा व अहेरी तालुक्यात भूकंपाचे धकके बसण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन्ही तालुक्यांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. तेव्हा या भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील रामगुंडमपासून ३५ किलोमीटर अंतरावर होता.

Earthquake
Earthquake in Nashik | नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यात 29 भूकंपाचे धक्के; पेठ, सुरगाणा अन् दिंडोरी परिसर हादरला

२०२४ च्या भूकंपाची तीव्रता अधिक

मागील पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात पाच वेळा भूकंपाचे धक्के सहन करावे लागले आहेत. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी सिरोंचा, अहेरी, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचेा धक्के बसले होते. त्याची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्री सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. ही तीव्रता ३.८ रिश्टर स्केल होती. त्यानंतर ४ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता ही मागील वेळच्या दोन्ही भूकंपापेक्षा अधिक म्हणजे ५.३ रिश्टर स्केल एवढी होती. त्याचे धक्के गडचिरोली शहरासह शेजारचा चंद्रपूर जिल्हा आणि छत्तीसगड राज्यालाही बसले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदूदेखील तेलंगणा राज्यातील मुलुगू येथे होता. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री पुन्हा जिल्ह्याच्या दक्षिण भागात भूकंप झाला आणि आज पहाटे पुन्हा भूकंपाचे धकके बसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news