शरद पवारांच्या पक्षात जाणाऱ्या मुलगी, जावयाला नदीत बुडवा : आत्राम यांचे वादग्रस्त विधान

Dharmaraobaba Atram | आत्राम कुटुंबात फूट पडण्याची शक्यता
State Minister Dharmarav Baba Atram
मुलीच्या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेवर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: आयुष्यभर पक्ष फोडण्याचे काम केल्यानंतर शरद पवारांचा पक्ष माझे घर फोडायला लागला आहे, असा आरोप करून माझ्या मुलगी आणि जावयाला नदीत बुडवा, अशा शब्दांत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraobaba Atram) यांनी संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (दि. ६) आलापल्ली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित जनसन्मान यात्रेत धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शरद पवारांचा पक्ष माझ्या मोठ्या मुलीला आपल्या पक्षात ओढण्यासाठी ताकद लावत आहे. लवकरच ते अहेरी येथे मेळावा घेणार आहेत. माझी मुलगी माझी होऊ शकली नाही, ती दुसऱ्यांची कशी होऊ शकेल, असा सवाल करीत धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraobaba Atram) यांनी मुलगी आणि जावयास नदीत बुडवून टाका, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला.

माझी एक मुलगी आणि जावई जरी आपल्याला सोडून जात असले, तरी दुसरी मुलगी, मुलगा, भाऊ, पुतण्या हे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला चिंता नाही, असेही ते म्हणाले. धर्मरावबाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर हे लवकरच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. भाग्यश्री आत्राम या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असून, त्यांना विधानसभेची निवडणूक लढायची आहे. परंतु धर्मरावबाबा आत्राम हे पुन्हा इच्छुक असल्याने भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांचा विरोध पत्करून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुटुंबातच कलगीतुरा रंगला आहे.

State Minister Dharmarav Baba Atram
गडचिरोली : बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news