गडचिरोली : बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

१ लाख ७० हजारांच्या लालेची केली होती मागणी
Junior engineer of construction department caught in ACB's net while taking bribe
बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यातPudhari File Photo
Published on
Updated on

जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोचमार्गाची सुधारणा केलेल्या कामाचे एमबी रेकार्ड देण्याकरिता संबंधित कंत्राटदाराला १ लाख ७० हजारांची लाच मागणारा धानोरा येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता अक्षय मनोहर अगळे यास गुरुवारी (दि.1) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

Junior engineer of construction department caught in ACB's net while taking bribe
बीड : शिक्षकाकडून लाच घेताना मुख्याध्यापक 'एसीबी'च्या जाळ्यात

तक्रारदार हा कंत्राटदार असून, त्याने बोधनखेडा पोचमार्ग तुमडीकसा-हिरंगे, रेंगेगाव-गोटाटोला, मुरुमगाव-रिडवाही येथील रस्त्यांची सुधारणा करुन एमबी मागितली. परंतु त्याकरिता कनिष्ठ अभियंता अक्षय अगळे याने संबंधित कंत्राटदारास १ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता अगळे याने पंचासमक्ष लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अक्षय अगळे याच्यावर धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.

Junior engineer of construction department caught in ACB's net while taking bribe
बीड : शिक्षकाकडून लाच घेताना मुख्याध्यापक 'एसीबी'च्या जाळ्यात

एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार राजेश पद्मगिरवार, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, प्रफुल्ल डोर्लीकर यांनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news