Dharmarao Baba Atram : भोजनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक: धर्मरावबाबा आत्राम

Dharmarao Baba Atram : भोजनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक: धर्मरावबाबा आत्राम
Published on
Updated on

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: भोजन व्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज (दि.१०)  गडचिरोली येथे दिली. Dharmarao Baba Atram

गडचिरोली येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. नागरिकांना स्वच्‍छ, सुरक्षित आणि सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. शिवाय लग्न व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भोजनाची व्यवस्था असल्यास आयोजकांना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्नधान्यातील भेसळ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे आत्राम यांनी सांगितले. Dharmarao Baba Atram

अन्न व औषध प्रशासन विभागातील ७५० रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यु काळे, जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. यावेळी आत्राम यांच्या हस्ते समाजकल्याण विभागाद्वारे संचालित मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news