Birsa Munda Jayanti | आदिवासींच्या शौर्य, संस्कृतीच्या राष्ट्रीय सन्मानासाठी केंद्र शासन कटिबद्ध : केंद्रीय मंत्री जुएल ओराम

गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
Birsa Munda Jayanti
Union Minister Juel OramPudhari
Published on: 
Updated on: 

Union Minister Juel Oram

गडचिरोली : आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शौर्य, त्याग आणि समृद्ध संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. गडचिरोलीसारख्या ऐतिहासिक आदिवासी भूमीत यंदाचा देशस्तरीय जनजातीय गौरव दिन साजरा होत आहे, ही विशेष अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जनजातीय कार्य मंत्री जुएल ओराम यांनी आज येथे केले.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. केंद्रीय मंत्री जुएल ओराम पुढे म्हणाले, गडचिरोलीची देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी निवड करण्यामागे विशेष महत्त्व आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतूक करुन ओराम यांनी गडचिरोलीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा सोहळा आयोजित होणे ही बदलत्या गडचिरोलीची महत्त्वपूर्ण ओळख असल्याचे सांगितले.

Birsa Munda Jayanti
Gadchiroli News | वैरागड किल्ल्याच्या विहिरीत पडून पहारेकऱ्याचा मृत्यू

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असून, त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे सांगून ओराम यांनी स्वतंत्र जनजातीय कार्य मंत्रालयापासून राष्ट्रीय गौरव दिनापर्यंतचा प्रवास नमूद केला.

देशातील ७०० हून अधिक आदिवासी समुदायांच्या इतिहासाचे स्मरण व्हावे, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान व्हावा आणि स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीरांच्या बलिदानाची माहिती नव्या पिढीला मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले की, या उपक्रमासाठी राज्यभरातून सुमारे ४० हजार कलाकारांनी नोंदणी केली असून, अडीच हजार कलाकारांना गडचिरोलीतील राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाची भाषा, देव-दैवते, लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे, असे डॉ. उईके यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून आदिवासी भाषा, संस्कृती आणि पारंपरिक जीवनपद्धतीच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य माया इवनाते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोली नगरपालिकेच्या अध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बन्सोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निलेश सागर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार देवराव होळी, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, प्रकाश गेडाम, रमेश बारसागडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आदिवासी समाजातील मान्यवर, कलाकार आणि नागरिक उपस्थित होते.

Birsa Munda Jayanti
Gadchiroli News | गडचिरोलीतील शिक्षक दाम्पत्याने नागपुरात संपवले जीवन!

पारंपरिक लोककला आणि आधुनिक डिजिटल कलाविष्कारांचा संगम

‘भगवान बिरसा कला संगम २.०’च्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या पारंपरिक कलांबरोबरच आधुनिक डिजिटल माध्यमांतील कलाविष्कारांनाही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकनृत्य, लोकसंगीत, गायन, वाद्यवादन, हस्तकला, चित्रकला, पारंपरिक पूजाविधी आणि सांस्कृतिक परंपरांबरोबरच रील्स, माहितीपट, ब्लॉग आणि लघुपट अशा आधुनिक कलाप्रकारांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.

उद्या देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा मुख्य सोहळा

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करून देशवासीयांना मार्गदर्शन करणार आहेत.

या राष्ट्रीय सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील विविध मान्यवरांची उपस्थिती नियोजित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.