The Burning Car : रस्त्‍याकडेने जाणाऱ्या 'त्‍या' मुलांचा इशारा अन् वाचले तिघांचे प्राण

हायवेवर द बर्निंग कारचा थरार; थोडक्यात बचावले आई, वडील आणि मुलगा
The Burning Car
The Burning Car : रस्त्‍याकडेने जाणाऱ्या 'त्‍या' मुलांचा इशारा अन् वाचले तिघांचे प्राणfile photo
Published on
Updated on

Highway Thriller: The Burning Car; Mother, Father, and Son Narrowly Escape

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा

देसाईगंज येथून गडचिरोलीकडे येत असलेली कार आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ अचानक पेटली. यावेळी कारमधील आई, वडील आणि मुलगा थोडक्यात बचावले. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

The Burning Car
Chandrapur Crime | चंद्रपूर हादरले! अघोरी पूजेचे रॅकेट उघड, कासव-घुबडांचा वापर, विधवा व कुमारिकांचे शोषण

मूळचे साकोली येथील रहिवासी असलेले अनिल डोंगरवार हे देसाईगंज येथे वास्तव्यास आहेत. आज गडचिरोली येथे त्यांच्या मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर होता. त्यासाठी ते पत्नी व मुलासह एम.एच. ३३-४४०३ इको स्पोर्ट या चारचाकी वाहनाने गडचिरोलीकडे येत होते. आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ पोहचताच कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागला.

ही बाब रस्त्याच्या कडेने जात असलेल्या दोन मुलांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ चालकास इशारा करुन कार थांबविण्याचा इशारा केला. दोन मुले काहीतरी सांगत असल्याचे बघून कारचालक अनिल डोंगरवार यांनी तत्काळ कार थांबवली. तोपर्यंत कारमधून जास्त धूर निघण्यास सुरुवात झाली. क्षणाचाही विलंब न लावता कार थांबवून डोंगरवार हे पत्नी आणि मुलासह कारमधून बाहेर पडले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, काही क्षणातच कारने पेट घेतला.

The Burning Car
Gadchiroli Crime | आरमोरीत थरार: क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलाने केला पित्याचा खून

माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कार जळाली होती. कार शॉर्ट सर्किटमुळे जळाली की अन्य काही कारण होते, हे अद्याप अस्पष्ट आहे. आरमोरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news