

Police raids gambling den in Poladpur, seizes Rs 12 lakh 4 thousand
पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा पोलादपूरमधील एका जुगार अड्यावर पोलीस अधिकारी योगिता कुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत छापा मारत मुद्देमालासह जुगार खेळणाऱ्या 40 ते 42 नागरिकांवर कारवाई केली. शनिवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गवरील लोहारे गावाच्या हद्दीत पोलादपूर नजीक असणाऱ्या शिवराज बियर शॉपीच्या मागील बाजूस असणाऱ्या एका अवैध जुगार अडयावर अनेक विविध पदावर काम करणारे नागरिक जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिस उपअधीक्षक प्रभारी अधिकारी म्हसळा पोलीस ठाणेच्या योगिता कुंडे यांनी पोलादपूरमध्ये येत आपल्या सहकाऱ्यांसमवेत छापा मारला असता सुमारे 38 नागरिक तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले आहेत, तर 4 नागरिक त्यांना साहित्य उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले असता पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेत सर्व साहित्य जप्त करून कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरापरर्यंत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप अधीक्षक प्रभारी अधिकारी म्हसळा पोलीस ठाणेच्या योगिता कुंडे याच्या समवेत पोलादपूर पोलीस ठाण्याचे सपोनि व्ही व्ही सुर्वे, अलिबाग पोलीस मुख्यालयचे आशिष अशोक गडदे यांच्यासह इतर पोलीस सहकारी यांनी छापा मारत या ठिकाणी 1 लाख 03 हजार 940 रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
यासह विविध कंपन्यांचे 29 मोबाईल सर्वांचे मूल्य 3 लाख 5 हजार , प्लास्टिक कॉइन 38 जणांकडून सुमारे 68 हजार 430 रुपयांचे 2 चारचाकी कार मूल्य 6 लाख, तीन दुचाकी मूल्य 1 लाख 50 हजार यासह 6 लाकडी टेबल मूल्य 30 हजार, 40 खुर्च्या 8 हजार, 2 कॉन्टॅर टेबल 8 हजार चे, काळा बोर्ड, 2 पांढरे बोर्ड, 20 जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्याचे कॅट 2 रजिस्टर 4 डावाचा आदी 12 लाख 4 हजार 940 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसानी केलेल्या कारवाईत महाड पोलादपूर माणगांसह महाबळेश्वर मधील नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये पोलादपूर तालुक्यातील धोंडू गायकवाड राजेंद्र कडू, भागोजी कदम ,करीम चिपळूणकर, रवींद्र म्हस्के, रामचंद्र पवार, महादेव जाधव, संदेश नरे, सुभाष शिंदे, सोनू सुतार, फरमान चिपळूणकर, गणेश उतेकर, मुकेश चांढवीकर, मंगेश चांढवीकर, सिंकंदर धामणकर तर महाड तालुक्यातील हनुवती मालुसरे, अजय पवार,
आत्माराम महाडिक, शशिकांत माने, मंगेश जगताप, संदेश गोलंबडे, उदय उंडरे, निलेश शिगवण, कैलास महाडकर, मनोज तांबे, अब्दुल संगमेश्वरी, चंद्रकांत आंबरे, सचिम चिणके, महेश जंगम, लक्ष्मण चिनके, मुकेश सावंत, राहुल कदम, जितेंद्र कासरे, माणगांव गोरेगाव विभागातील महेंद्र पिसाट, ज्ञानेश्वर घसाडे, राम भोईर, रामचंद्र जुमारे, पांडुरंग करकरे, तुकाराम चरफरे, अजीज गजगे, आदींचा समावेश आहे.
तर महाबळेश्वर सातारा खोऱ्यातील संतोष मोरे, संतोष जाधव यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्या प्रकरणी फिर्याद पोलीस शिपाई आशिष गडदे यांनी दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईने जुगार धारकाचे धाबे दणाणले असून इतर अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.