Gadchiroli Naxal Movement| बिनागुंडातून ताब्यात घेतलेल्या 'त्या' दोन नक्षलींना अटक

न्यायालयाने दिली चार दिवसांची पोलिस कोठडी
Gadchiroli Naxal News
बिनागुंडातून ताब्यात घेतलेल्या 'त्या' दोन नक्षलींना अटकPudhari Photo
Published on
Updated on

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथून ताब्यात घेतलेल्या दोन नक्षलींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राधिका बुचन्ना मडावी व पोडिया आयतू कुंजाम अशी त्यांची नावे आहेत. राधिका ही छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील नेंडरा, तर पोडिया हा मरतूर येथील रहिवासी आहे. दोघेही प्लाटून क्रमांक ३२ चे सदस्य आहेत. २० मे रोजी पोलिसांनी बिनागुंडा येथून पाच नक्षलींना ताब्यात घेतले होते. त्यातील उंगी मंगरु होयाम उर्फ सुमली, पल्लवी केसा मिडियम उर्फ बंडी आणि देवे कोसा पोडियाम उर्फ सविता या तिघांना अटक केली होती, तर राधिका व पोडिया यांनी अल्पवयीन असल्याचे सांगितल्याने त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यात ते अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Gadchiroli Naxal News
अबुजमढमध्ये संयुक्त नक्षलविरोधी कारवाईत 4 नक्षलींचा खात्मा, एक जवान शहीद

नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश व सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.

Gadchiroli Naxal News
छतीसगडमध्‍ये चकमकीत दोन नक्षलींचा खात्‍मा, स्‍फोटात दोन जवान जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news