Tobacco Seized Gadchiroli | प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक; दोघांना अटक

९ लाख ७२ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त; चामोर्शी पोलिसांची कारवाई
Scented Tobacco Seized Gadchiroli
Scented Tobacco Seized GadchiroliPudahri
Published on
Updated on

Scented Tobacco Seized Gadchiroli

गडचिरोली : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. या कारवाईत विविध प्रकारचा सुगंधित तंबाखू आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ९ लाख ७२ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नंदकिशोर दिवरुजी शेट्टे (वय २१,रा.चामोर्शी आणि राजेंद्र ईश्वर नैताम (२१), रा.मार्कड मोहल्ला, चामोर्शी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ४ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी वर, पोहार नदीच्या पुलाजवळ कुरुड गाव परिसरात सापळा रचला. यावेळी एमएच ३३ टी ५८९२ क्रमांकाचे बोलेरो मॅक्स पिकअप वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते अडवून तपासणी केली.

Scented Tobacco Seized Gadchiroli
Gadchiroli Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ वर्षांच्या कारावासासह १० हजाराचा दंड

वाहनाच्या झडतीत १८०० पॅकेट हुक्का टोबॅको, ४०० डबे मजा सुगंधित तंबाखू, ईगल नावाचे ११५ पाकिटे तसेच ४०० डबे ईगल हुक्का शिशा तंबाखू आढळून आला. या तंबाखूची किंमत ६ लाख ७२ हजार ७२५ रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेले बोलेरो मॅक्स पिकअप वाहन अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे आहे.

चौकशीत हा मुद्देमाल चंद्रकांत शत्रुघ्न पिपरे याच्या सांगण्यावरून आणल्याचे आरोपींनी सांगितले. पिपरे याचा शोध सुरू आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश पोसन्ना तोर्रेम यांच्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मानकर प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Scented Tobacco Seized Gadchiroli
Gadchiroli Cyber Crime | शेअर मार्केटच्या नावाखाली दोघांची ६५ लाखांची फसवणूक

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news