

Surjagad Yatra 2026
गडचिरोली : बळजबरीने जंगल नष्ट करून खाणींविरोधात शेकाप, डावी लोकशाही आघाडी आणि ग्रामसभांच्या वतीने सातत्याने विरोध करण्यात येत असला; तरी जिल्ह्याच्या भौतिक विकासासाठी आदिवासी नेत्यांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केले.
सुरजागड येथे तीन दिवस चाललेल्या ठाकूरदेव यात्रेच्या दुसऱ्या दिवशी डावी आघाडी आणि रामदास जराते यांच्या वतीने सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. अपवादात्मक कारणे वगळता आदिवासी संस्कृती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची जोपासना करत विकास करण्यावर भर असून, ठाकूरदेव देवस्थानासह एट्टापल्ली तालुक्यातील विविध कामांसाठी मोठा निधी लवकरच खेचून आणणार असल्याची ग्वाहीही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम, हर्षवर्धनबाबा आत्राम, एट्टापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, माजी जि.प.सदस्य संजय चरडुके, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, शिवसेना (उबाठा) चे विवेक बारसिंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते गाव गणराज्याचा संघर्ष नामक पुस्तिकेचे प्रकाशन करुन यात्रेत मोफत वितरण करण्यात आले. ग्रामसभांचे नेते आणि आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सैनू गोटा, गोपाल उईके, शीला गोटा, ॲड.लालसू नरोटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.देवराव चवळे, सहसचिव ॲड.जगदीश मेश्राम, कॉ.विनोद झोडगे, कॉ.सचिन मोतकुरवार, कॉ.सूरज जक्कूलवार, राहुल येमुलवार, प्रकाश बन्सोड, विनोद मडावी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, संगीता चांदेकर, विद्या गोहणे, भाई चंद्रकांत भोयर, बाजीराव आत्राम, योगेश चापले, अक्षय कोसनकर, चिरंजीव पेंदाम, सतीश दुर्गमवार, आकाश आत्राम, लक्ष्मण वेळदा, रमेश आतलामी, राजेश तलांडे, सूरज ठाकरे, आशिष नेवारे यांनी सहकार्य केले.