Gadchiroli Brothers Death | सौर झटका मशिनच्या धक्क्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

देसाईगंज तालुक्यातील चिखली येथील घटना
Desainganj Taluka Solar Fence Shock
Two Brothers DeadPudhari
Published on: 
Updated on: 

Desainganj Taluka Solar Fence Shock

गडचिरोली : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या सौर झटका मशिनचा धक्का बसल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. देसाईगंज तालुक्यातील चिखली येथे शुक्रवारी (ता.९) दुपारी २ वाजता ही घटना उघडकीस आली. अरविंद धर्माजी बुद्धे (वय ५०) व अशोक धर्माजी बुद्धे (वय ५८) अशी मृत भावंडांची नावे आहेत.

बुद्धे परिवाराची गावापासून काही अंतरावर जंगलालगत शेती आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अरविंद बुद्धे हे शेतात कीटकनाशक फवारण्यासाठी गेले. परंतु दुपार होऊनही ते घरी न परतल्याने मोठे भाऊ अशोक बुद्‌धे शेतावर गेले. तेव्हा अरविंद हे सौर झटका मशिनच्या तारेच्या कुंपणाजवळ मृतावस्थेत आढळले. अशोक यांनी अरविंदला स्पर्श करताच जोरदार धक्का बसल्याने तेही मृत्यूमुखी पडले.

Desainganj Taluka Solar Fence Shock
Gadchiroli News | नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली देशात प्रथम

बराच वेळ होऊनही दोन्ही भाऊ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतावर जाऊन बघितले असता दोघेही मृतावस्थेत आढळले. घटनेच्या वेळी गावात मस्कऱ्या गणपतीच्या विसर्जनाची तयारी सुरु होती. मात्र, दोन भावांचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच चिखली गावावर शोककळा पसरली. घटनेनंतर देसाईगंजचे पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

दोन कमावते भाऊ गेले, एक भाऊ अंथरुणाला खिळलेला

अरविंद, अशोक व टिकाराम हे तीन भाऊ. सर्वात थोरले टिकाराम यांचा दोन महिन्यांपूर्वी अपघात झाल्याने ते अंथरुणावर खिळलेले आहेत. त्यामुळे अशोक आणि अरविंद हे वडिलोपार्जित ६ एकर शेती सांभाळायचे. परंतु काल दोन्ही धाकट्या भावांचा मृत्यू झाल्याने बुध्दे कुटुंबावर मोठे अरिष्ट कोसळले. अशोक यांना एक मुलगा व एक मुलगी, तर अरविंद यांना दोन मुली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news