

गडचिरोली : स्वत:हून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासीयांना केवळ आश्वासनांचे लॉलीपॉप दिले, मात्र विकास केला नाही, अशी टीका करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज लॉलीपॉपयुक्त केक कापून आणि लॉलीपॉप व चॉकलेट वाटून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्यात असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात लॉलीपॉप वाटपाचा हा उपरोधिक कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापुढे लॉलीपॉपयुक्त केक कापून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लॉलीपॉप व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री असलेले मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांनी कधीही जिल्ह्यातील युवक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला नाही. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही. फडणवीस यांनी केवळ नागरिकांना फक्त आश्वासनाचे लॉलीपॉप देण्याचे काम केले. त्यामुळे आम्ही लॉलीपॉप वाटपाचा कार्यक्रम घेतल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अॅड.कविता मोहरकर, कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन नाट, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदू वाईलकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शंकरराव सालोटकर, अनिल कोठारे, घनश्याम वाढई, विनोद लेनगुरे, प्रभाकर वासेकर,
हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, लालाजी सातपुते, दिवाकर निसार, प्रतीक बारसिंगे, योगेंद्र झंझाड, श्रीनिवास ताटपल्लीवार, सुरेश भांडेकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पौर्णिमा भडके, शालिनी पेंदाम, जे.एम.मुप्पीडवार, सुदर्शन उंदिरवाडे, ज्ञानेश्वर पोरटे, उत्तम ठाकरे, सुधाकर ठाकूर, छबीलाल, रुपेंद्र नाईक, लक्ष्मण राणा यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते,पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.