Gadchiroli Bribe | कंत्राटदाराकडून १ लाख २० हजारांची लाच घेताना भाजप नगरसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात

काम मिळाल्याचे कमिशन म्हणून विद्युत कंत्राटदाराकडून मागितली लाच
Gadchiroli Municipal Council  BJP Corporator Bribe
भाजप स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार Pudhari
Published on: 
Updated on: 

Gadchiroli Municipal Council BJP Corporator Bribe

गडचिरोली : नगर पंचायतींतर्गत मिळालेल्या विद्युत कामाचे कमिशन म्हणून एका कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहेरी नगर पंचायतीचा भाजपचा स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार (वय ४७) यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि.१५) केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या कंत्राटदाराला अहेरी नगर पंचायतीकडून विद्युतविषयक कामाचे कंत्राट मिळाले आहे. या कामाचे कमिशन म्हणून नगरसेवक अमोल गुडेल्लीवार याने संबंधित कंत्राटदाराला १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Gadchiroli Municipal Council  BJP Corporator Bribe
Gadchiroli News | नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली देशात प्रथम

त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेची पडताळणी करुन आज सापळा रचला. त्यानुसार दुपारी १ वाजताच्या सुमारास अहेरी येथील मुख्य बाजारपेठेत अमोल गुडेल्लीवार यास तक्रारकर्त्या कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर अहेरी पोलिस ठाण्यात अमोल गुडेल्लीवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नीलेश लोधी, गडचिरोलीचे उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news