Gadchiroli Teacher Sentenced | पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन; शिक्षकाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

अहेरी न्यायालयाचा निकाल; विविध कलमांन्वये ७० हजारांचा दंड
Bhamragad School Misconduct Case
Aheri Court Verdict Pudhari
Published on: 
Updated on: 

Aheri Court Verdict Bhamragad School Misconduct Case

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिक्षक तथा मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे (४३) यास अहेरीच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि ७० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. गुरुवारी (दि.१) न्यायालयाने हा निकाल दिला.

मार्च २०२५ मध्ये कुकामेटा येथील एकशिक्षकी शाळेत हा प्रकार घडला होता. गव्हारे हा तिसरी ते पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या ९ ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींना आपल्या कक्षात एकट्याने बोलावून त्यांच्याशी लैंगिक गैरवर्तन करीत असल्याचे तपासात समोर आले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारहाण करण्याची तसेच शाळेतून काढून टाकण्याची धमकी तो विद्यार्थिनींना देत होता.

Bhamragad School Misconduct Case
Gadchiroli News : मसेलीच्या आश्रमशाळेतून मध्यरात्री दोन विद्यार्थिनी बेपत्ता!

दरम्यान, दोन सख्ख्या बहिणींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या आईने कारण विचारले. त्यावेळी घाबरलेल्या मुलींनी रडत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या आईने लाहेरी उपपोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान शाळेतील आणखी काही विद्यार्थिनींसोबतही अशाच प्रकारचे गैरवर्तन झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी गव्हारे याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

भामरागडचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षीदार आणि पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने गव्हारे यास भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ अंतर्गत पाच वर्षांचा कारावास व २५ हजार रुपये दंड, कलम ७५ (२) अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व २५ हजार रुपये दंड, तसेच धमकी दिल्याप्रकरणी बीएनएस कलम ३५१ (२) (३) अंतर्गत दोन वर्षांचा कारावास सुनावला.

Bhamragad School Misconduct Case
Gadchiroli News : पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्टिंग

याशिवाय अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन व दोन वर्षांच्या शिक्षेसह २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड.अरुण मसराम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

logo
Pudhari News
pudhari.news