Gadchiroli News | आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: विद्यार्थिनी समृद्धी नैताम अजूनही व्हेंटिलेटरवरच!

Gadchiroli News | आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: नागपुरात भरती समृद्धी नैताम अजूनही व्हेंटिलेटरवरच!
Gadchiroli News | आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: नागपुरात भरती समृद्धी नैताम अजूनही व्हेंटिलेटरवरच!
Published on
Updated on

गडचिरोली,: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील सर्पदंश झालेल्या तीन विद्यार्थिनींपैकी नागपूरला हलविलेल्या समृद्धी नैताम या विद्यार्थिनीला अजनूही व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले असून, तिची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती आहे.

१० ऑगस्टच्या मध्यरात्री जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत विषारी सापाने दंश केल्याने दीपिका लकडा, सुष्मिता मंडल व अनू कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर दीपिका मडावी, कविता किरंगे व समृद्धी नैताम या तिघींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर दोघांना अटक करण्यात आली आहे.

घटनेच्या दिवशीच दीपिका मडावी हिला नागपूरला एअरलिफ्ट करण्यात आले. त्यानंतर १४ ऑगस्टला तिला आणि गडचिरोलीत भरती असलेल्या कविता किरंगे हिलादेखील सुटी देण्यात आली.

Gadchiroli News | आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: नागपुरात भरती समृद्धी नैताम अजूनही व्हेंटिलेटरवरच!
Gadchiroli Ashram School तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळेचे संस्थाध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल!

मात्र, १५ ऑगस्टला भल्या सकाळी समृद्धी नैताम हिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्‌यालयात हलविण्यात आले. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून, अजून दोन दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवले जाणार आहे. तिच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तिची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिल्याचे आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी 'पुढारी'ला सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news