Gadchiroli Ashram School तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळेचे संस्थाध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल!

दोन अधीक्षकांवरही गुन्हे दाखल, सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्‍यू
Gadchiroli Ashram School  तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळेचे संस्थाध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल!
Published on
Updated on

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, काँग्रेस नेते माजी मंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि दोन अधीक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळा ही कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारे संचालित केली जाते. सोमवारी(ता.१०) मध्यरात्री जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे दीपिका लकडा(१२), सुष्मिता मंडल(१४) आणि अनू कोरेटी(८) या तीन मुलींचा मृत्यू झाला, तर दीपिका मडावी(११), कविता किरंगे(१२) आणि समृद्धी नैताम(१४) या तीन विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी दीपिका मडावी हिच्यावर नागुपरात उपचार सुरु आहेत.

Gadchiroli Ashram School  तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळेचे संस्थाध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल!
Gadchiroli News | राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

या घटनेच्या दिवशीच सहपालकमंत्री आशिष जयस्वाल तसेच आज आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आश्रमशाळेला भेट देऊन माहिती जाणून घेतली. घटनेसंबंधी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने मुख्याध्यापक, मुलींच्या अधीक्षिका व मुलांचे अधीक्षक दोषी आढळल्याने आज सहायक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार यांच्या फिर्यादीवरुन सुरुवातीला आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार व अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

पुढे बऱ्याच घडामोडी घडल्यानंतर आज संध्याकाळी कुपारलिंगो संस्थेचे अध्यक्ष, काँग्रेस नेते तथा माजी राज्यमंत्री व खासदार मारोतराव कोवासे तसेच त्यांचे सुपुत्र संस्था सचिव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजित कोवासे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६ (१), १२५ (अ),१२५ (ब), ३(५) तसेच बाल न्याय (दुरुस्ती)अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news