Gadchiroli News | राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झालेल्या जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेला दिली भेट
Aashram Sala | राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके
Aashram Sala | राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके
Published on
Updated on

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर आज आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे येत्या तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचे उईके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

डॉ.अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, विश्रांती कक्ष, स्वयंपाकगृह तसेच परिसराची पाहणी केली. विद्यार्थिनींसाठी पलंगांची अपुरी सुविधा, मच्छरदाणीचा अभाव, अस्वच्छ स्वयंपाकगृह आणि अशुद्ध पिण्याचे पाणी आढळून आल्याने डॉ.उईके यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांनी आश्रमशाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पालकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

Aashram Sala | राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके
Gadchiroli Ashram School | तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह दोन अधीक्षकांवर गुन्हे दाखल

राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांचे पुढील तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याची घोषणा डॉ.अशोक उईके यांनी केली. आश्रमशाळांची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाचीही चौकशी करण्यात येणार असून, हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई तातडीने करुन संस्थाचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. याप्रसंगी आ.डॉ.मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलिस अधीक्षक एम.रमेश, प्रकल्प अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

१५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांची अन्यत्र व्यवस्था

जपतलाई येथील सर्व विद्यार्थ्यांची येत्या १५ ऑगस्टपर्यंत चांगल्या निवासी सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण असलेल्या शाळेत व्यवस्था करावी, जेणेकरुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असेही निर्देश डॉ.उईके यांनी दिले.

रुग्णालयात भरती विद्यार्थिनींची विचारपूस

शाळेला भेट दिल्यानंतर डॉ.उईके यांनी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news