Gadchiroli Protest | 'रिक्त पदे भरा, अन्यथा उपोषण!' अहेरीत रुग्णालयाबाहेर आंदोलन; कुलूप ठोकण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई

नगरसेवक अमोल मुक्कावार व त्यांच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले
Gadchiroli  Aheri Women And Child Hospital  Vacant Posts
नगरसेवक अमोल मुक्कावार व त्यांच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी सोमवारी (दि.२९) प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. Pudhari
Published on
Updated on

Gadchiroli Aheri Women And Child Hospital Vacant Posts

गडचिरोली : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि इतर महत्त्वाची रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न करणारे नगरसेवक अमोल मुक्कावार व त्यांच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी सोमवारी (दि.२९) प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. त्यामुळे रुग्णालय परिसरात निर्माण होऊ शकणारा तणाव वेळेतच नियंत्रणात आला.

महिला व बाल रुग्णालयातील अनेक महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने रुग्णांना पुरेशा आरोग्यसेवा मिळत नसल्याचा आरोप करत नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी २२ जून रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले होते. २८ जूनपर्यंत रिक्त पदे भरली नाहीत, तर २९ जून रोजी रुग्णालयाला कुलूप ठोकून ३० जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता.

Gadchiroli  Aheri Women And Child Hospital  Vacant Posts
Gadchiroli Maoist | माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी दुपारी मुक्कावार आणि त्यांचे सहकारी महिला व बाल रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच आरोग्य उपसंचालकांशी दूरध्वनीवरून संवादही घडवून आणला. मात्र, रिक्त पदे भरण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकण्यासाठी पुढे सरसावण्याचा प्रयत्न केला.

परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्यासह चार सहकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलनाचे पुढील पाऊल तात्पुरते रोखण्यात पोलिसांना यश आले.

Gadchiroli  Aheri Women And Child Hospital  Vacant Posts
Illegal Sand Mining Gadchiroli | अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडल अधिकारी, तलाठी निलंबित ; तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरली नाहीत, तर ३० जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा पुन्हा दिला आहे. संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात महिला व बाल रुग्णालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news