Gadchiroli Maoist | माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

Gadchiroli Maoist | माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
Published on
Updated on

गडचिरोली : गडचिरोली पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात मोठी कारवाई करत माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या विशेष शोध मोहिमेत तब्बल 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर व बीजीएल पाईप्स, 220 नग 12 बोअर पाईप्स तसेच 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या.

ही कारवाई 26 व 27 जून रोजी विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने केली. परिसराची कसून तपासणी करून माओवाद्यांनी पुरून ठेवलेले साहित्य शोधण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. तसेच पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. या धाडसी कारवाईबद्दल सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले.

ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यात माओवादी कारवायांना मोठा धक्का मानली जात असून, सुरक्षा दलांनी माओवादी संघटनेच्या शस्त्रसाठ्यावर आणखी एक प्रभावी प्रहार केल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news