Gadchiroli News | 'गो मलेरिया गो…' गडचिरोलीत काँग्रेसने केले 'थाली बजाव' आंदोलन

प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे जिल्ह्यात अडीच हजाराहून अधिक हिवतापाचे रुग्ण
Gadchiroli News
गडचिरोलीत काँग्रेसने केले 'थाली बजाव' आंदोलनPudhari Photo
Published on
Updated on

गडचिरोली : जिल्ह्यात हिवतापाचा प्रकोप वाढत चालला असून, अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. परंतू शासन आणि प्रशासन प्रभावी उपाययोजन करताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आज जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर 'गो मलेरिया गो… पालकमंत्री दो' अशा घोषणा देत 'थाली बजाव' आंदोलन केले.

शासन व प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे जिल्ह्यात अडीच हजाराहून अधिक हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. शिवाय आठवडाभरात दहापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु प्रभावी उपाययोजना करण्यात येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविका व अन्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. पावसाळा सुरु होऊनही अनेक गावांमध्ये औषध साठा पोहचला नाही. उपजिल्हा रुग्णालयांमध्येही सुविधांचा अभाव आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लाँट सुरु करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. परंतु काम पूर्ण न झाल्याने हे प्लाँट धूळखात आहेत. एकूणच आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली असून, शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाने आज 'गो मलेरिया गो… पालकमंत्री दो' अशा घोषणा देत 'थाली बजाव' आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देण्यात आले.

Gadchiroli News
Gadchiroli Rain News | गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस, पुरामुळे १९ मार्ग बंद

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष नंदू वाईलकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हा महासचिव घनश्याम वाढई, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, अनिल कोठारे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, प्रतीक बारसिंगे, हेमंत मोहितकर, चारुदत्त पोहाणे, स्वप्नील बेहरे, सुभाष धाईत, सुभाष बांबोळे, माजीद सय्यद, नीळकंठ पेंदाम, काशिनाथ गावतुरे, सुधीर बांबोळे, अनिल तुमराम, दिलीप चुधरी, दीपक चौधरी, यादव गेडाम, उत्तम ठाकरे, निखिल पुण्यप्रेड्डीवार, मिलिंद बारसागडे, राजू सामृतवार, विजय पोहनकर, संदीप उईके, हेमराज प्रधान, कल्पना नंदेश्वर, सुनीता रायपुरे, रिता गोवर्धन, शालिनी पेंदाम सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news