Gadchiroli Tiger Attack : कापूस वेचण्याचे काम करत असताना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | पुढारी

Gadchiroli Tiger Attack : कापूस वेचण्याचे काम करत असताना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

गडचिरोली; पुढारी ऑनलाईन: शेतात कापूस वेचण्याचे काम करीत असताना वाघाने एका महिलेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिला ठार झाली आहे. ही घटना आज (दि.७) दुपारी  गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे घडली. सुषमा देविदास मंडल (५५) असे मृत महिलेचे नाव आहे. (Gadchiroli Tiger Attack)

चिंतलपेठ येथे गोंदूबाई दुर्गे यांच्या घरानजीकच्या शेतात कापूस वेचण्याचे काम सुरु आहे. सुषमा मंडल ही महिला कापूस वेचण्यासाठी गेली होती. सुषमा मंडल व अन्य एक महिला कापूस वेचत असताना अचानक वाघाने हल्ला केला. दोघींनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने पुन्हा जोरदार हल्ला केला. यात सुषमा मंडल ही महिला जागीच ठार झाली. घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. (Gadchiroli Tiger Attack)

हेही वाचा:

Back to top button