गडचिरोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापक ठार, शिक्षक जखमी

गडचिरोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापक ठार, शिक्षक जखमी

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत खासगी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ठार झाले तर शिक्षक जखमी झाला. ही घटना आज (दि.२५ ) सकाळी आलापल्ली-भामरागड मार्गावरील मिरकल फाट्यावर घडली. किशोर मद्देर्लावार (वय ५३) असे मृत मुख्याध्यापकाचे, तर रमेश गौरकर (वय ५०) असे जखमी शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मद्देर्लावार व गौरकर हे दोघे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजे धर्मराव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मन्नेराजाराम येथील राजे धर्मराव आश्रमशाळेत कार्यरत होते. शाळेचे ऑडिट असल्याने दोघेही मोटारसायकलने मन्नेराजाराम गावाकडे जात होते. मिरकल फाट्यावर पोहचताच समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मुख्याध्यापक किशोर मद्देर्लावार जागीच ठार झाले. रमेश गौरकर जखमी झाले. गौरकर यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत किशोर मद्देर्लावार यांच्‍या पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news